बोल.. मी अनुभवलेले..
बोल.. मी अनुभवलेले..
कधी कधी माझ मलाच आश्चर्य वाटत,
मनावर खूप मळभ दाटत,
ते दूर पळवून लावायला बळ कुठून येत??
कधी कधी माझं मलाच आश्चर्य वाटत,
कधीतरी खूप रडायला येत,
तेव्हा त्या अश्रूंना कोण बरं आवरत??
कधी कधी माझं मलाच आश्चर्य वाटत,
नुसतं शांत एकटक बसून रहावस वाटत,
त्यावेळी पुढ्यात पडलेली काम उरकायला
अंग कस काय हलत??
कधी कधी माझं मलाच आश्चर्य वाटत,
स्वतः आतून हादरलेल असताना
दुसऱ्याला कस काय सावरता येत??
कधी कधी माझं मलाच आश्चर्य वाटत,
सगळे संपलय अस तुम्हाला वाटत असताना,
नवी उमेद जागवायला मला कस काय जमतं??
कधी कधी माझं मलाच आश्चर्य वाटत,
स्वत:शी झगडत पुढे जाणं कधीच सोप्पा नसतं,
तरीही प्रत्येक वेळी लढायला
मन कसं बर तयार असतं??
