STORYMIRROR

Trupti Naware

Abstract Others

4  

Trupti Naware

Abstract Others

प्रवास

प्रवास

1 min
315

कालच्या राञीचा प्रवास

राञीची तारकांची आरास

हळुवार विरघळणार्या सांजेत

कातर होत जाणारा श्वास....

गंधाळलेल्या प्राजक्तात

अंधारलेले अंगण

डोकावणार्या चंद्राचा

सुखावणारा भास....

किर्र करणाऱ्या पाखरांना

वेळेचे असेल बंधन

काळोखास तरी आवडतो

आकाशाचा सहवास....

कालच्या राञीच्या प्रवासात

असेल काही खास

पहाटेच्या सोनेरी दवाने

कुरवाळले मिटल्या पापण्यास..!!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract