निर्माल्य
निर्माल्य
1 min
607
एकाच जागी देठावर उमलून
थांबलेल्या फुलासारख
झालंय आयुष्य ....
हलतय.. झुलतय
वाऱ्याला स्पर्शून
नवा श्वास घेतय ..
सांजवेळ येते कातर
तेव्हा मात्र कोमेजतय ..
एकाच जागी देठावर कोमेजण्यापेक्षा
घुटमळत राहाव स्वतःभोवती
निर्जीव सुगंधात वेड्यापरी
कारण कोमेजल्या फुलांच
कधीच नसत भविष्य
थांबलेल्या श्वासासारख
होऊन जात आयुष्य
एकाच जागी देठावर
वेड होऊन जगण्यापेक्षा
गाभार्यात तरी जागा मिळावी
पाकळ्या होऊन पायदळी जाण्यापेक्षा
निर्माल्य होऊन आत्महत्या तरी करावी !!!!!