STORYMIRROR

Anita Bodke

Abstract

4  

Anita Bodke

Abstract

गझल

गझल

1 min
648

निखरला रंग हा चेहर्‍याचा किती

जीव वेडापिसा आरशाचा किती


ये हळूवारशा पावलांनी सये

नाद येतो म्हणे पैंजणाचा किती


साद आधीच तू द्यायची ना जरा

धाक आता मला उंबर्‍याचा किती


मुक्त केले तरीही उडेना कसे

पाखराला लळा पिंजर्‍याचा किती


रंग नाही नसू दे बिघडते कुठे

दरवळे गंध हा मोगर्‍याचा किती


मी कसे सांग समजून सांगू तुला

राग येतो तुला बोलण्याचा किती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract