ना भेदभाव कुठला
ना भेदभाव कुठला
1 min
740
ना भेदभाव कुठला ना जातपात राहो!
देशात बांधवाचे हातात हात राहो!
स्वातंत्र्य भारताचे माझ्या अभंग आहे
फडकत सदा तिरंगा सा-या जगात राहो!
हा धर्म माणसाचा ही जात माणसाची
माणूस माणसाच्या आता मनात राहो!
हे प्राण काल ज्यांनी देशास वाहिलेले
स्मृती सदा तयांच्या हर काळजात राहो!
नांदो शांतता अन् नांदो ऐक्य येथे
जयकार भारताचा दाही दिशात राहो!
