तुझी आठवण
तुझी आठवण
1 min
245
फार बेभान झाली तुझी आठवण
चिंब अश्रूत न्हाली तुझी आठवण
रात्र सारीच स्वप्नात गेली तुझ्या
जाग येताच आली तुझी आठवण
गाठते ती कधीही कुठेही मला
हासते गोड गाली तुझी आठवण
थांग लागू तुझा देत नाहीस तू
मात्र देते खुशाली तुझी आठवण
भास होतो तुझा सारखा सारखा
सारखी साद घाली तुझी आठवण
सोडले तू जरी सोडते ती कुठे
राहते भोवताली तुझी आठवण
जा म्हणावे तरी जात नाहीच ती
फार जिद्दी निघाली तुझी आठवण
