STORYMIRROR

Anita Bodke

Romance

4  

Anita Bodke

Romance

प्रेमापुढे....

प्रेमापुढे....

1 min
497

सौख्य मातीमोल त्याला वाटले प्रेमापुढे

शेवटी आभाळ सुद्धा वाकले प्रेमापुढे


कृष्ण-राधा, हीर रांझा हेच गेले सांगुनी

आजवर नाही कुणीही जिंकले प्रेमापुढे


आणखी मी काय द्यावे सांगना प्रेमा तुला

एकदा सर्वस्व माझे हारले प्रेमापुढे


फारसा उपयोग नाही समजुनी सांगू किती

का कधी वेड्या मनाचे चालले प्रेमापुढे ?


सांगतो इतिहास इतके कालचा आता मला

की शहाणे लोकही वेडावले प्रेमापुढे


कोण जाणे काय होते एवढे त्याच्यामधे

संपले मी, संपले मी, संपले प्रेमापुढे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance