STORYMIRROR

Anita Bodke

Others

3  

Anita Bodke

Others

बालपणीची शाळा

बालपणीची शाळा

1 min
315

मला वाटते आज शाळा हवीशी

मला वाटते बघ शिकावे पुन्हा

जुने दिवस सारे पुन्हा आज यावे

जुने मित्र सारे दिसावे पुन्हा


सकाळी सकाळी तयारी करावी

अशी धाव घ्यावीच शाळेकडे

लिहावे पढावे किती बागडावे

जणू फूल व्हावेच बागेतले


धडा जीवनाचा गिरवला इथे मी

अहोभाग्य ऐसे गुरु लाभले

कधी चूक होता छडी मारलेली

कधी जवळ घेवून समजावले


असे सोबती काल साथीस होते

पहा घास देतात घासातला

मला आठवे आज सारे नव्याने

कसा कोण जाणे गळा दाटला


किती काय शिकलो कसे आज सांगू

दिले पाठ होते यशाचे मला

मिळे आज आकार या जीवनाला

जरी ज्ञान नव्हते कशाचे मला


लिहू काय त्यावर किती आज मीही

कधी प्रेम शब्दात का मावले

मला ज्ञान देती गुरू मित्र माझे

तयांची सदा वंदिते पावले


साहित्याला गुण द्या
लॉग इन