STORYMIRROR

Anita Bodke

Tragedy Others

4  

Anita Bodke

Tragedy Others

गजल

गजल

1 min
396

सांभाळण्यास त्यांचे नामोनिशान आता

ही टाकलीच निष्ठा त्यांनी गहान आता


विकण्यास काढलेले ज्यांनी इथे स्वतःला

तेजीत चाललेले त्यांचे दुकान आता


पटले न तत्व ज्यांचे, केला विरोध केला

त्यांच्यापुढेच त्यांची झुकणार मान आता


सत्ताच देव त्यांचा सत्ताच धर्म आहे

सत्तेपुढे कशाचे नाहीच भान आता


त्यांच्या खरेपणाची चर्चा दिशेदिशेला

ऐकून बोल खोटे विटलेत कान आता


लाजून देश गेला पाहून बेइमानी

तुमच्याकडेच ठेवा तुमचे इमान आता



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy