STORYMIRROR

मी बळीराजा

मी बळीराजा

1 min
1.2K


वैरण नाही जनावरांना

परी प्यायला नाही पाणी

भुईला पडल्यात भेगा

संग दुष्काळाची आणीबाणी


पावसानं मारलीया दडी

एक टिपूस भी नाही पाणी

सारं पीक जळून गेलंया

पण ऐकायला कुणी नाही


कधी शेतमालाला नसतोया भाव

कधी लागतीया पिकाला कीड

कधी स्वतःवरच हसू येतं

कधी येते स्वतःची चीड


पोटाला काढून चिमटा

मग दिसभर करतोय काम

लेकराबाळांना उपाशी ठेवून

फेडतोय सावकाराचं दाम


गळफास घेऊन मरु काय

करू का थोडी हिंमत

पण त्यातून प्रश्न सुटेल का

कळेल का शेतकऱ्याची किंमत


आत्महत्या म्हणजे पाप

फक्त धर कष्टाची वाट

पुन्हा एकदा नव्या जोमात

कर दुष्काळाशी दोन हात


बळीराजा म्हणतात मला

आता कितीही येऊ दे संकट

दुष्काळाला मात देण्यास

आता कसली आहे कंबर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy