STORYMIRROR

Shreyash Shingre

Others

4  

Shreyash Shingre

Others

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली

1 min
150

मराठी असे आमुची मायबोली

असे ही आमुची माय आणिक बाप

अशी भाषा ही जिंके अमृतातही पैजा

तिचे उपकार असती आम्हांवरी अमाप


कला आणि साहित्य ऐसे लाभले आम्हां

अन्य कुणा भाषांस असे लाभलेच नाही

साहित्य संमेलनही भरत असे दरवर्षी

कुणा भाषेत साहित्यिकांचे ऐसे भरतच नाही


अशी ही भाषा जिचा गोडवा अवीट

नाही तिच्याविना असे कुणास आधार

गुणगान नेहमी जिचे गातो आम्ही सारे

होतेय तीच आपल्यातूनच हद्दपार


'लाभले आम्हांस भाग्य' ऐसे बोलतो अभिमानी

तरी शिकवतो मुलांस इंग्रजीच्याच शाळेत

मोडकळीस आलेली ती मराठी शाळा

घेऊन जाते पुन्हा भूतकाळात


पुन्हा एकदा या भाषेचे पडघम ऐसे वाजूद्या

हर हर महादेव आरोळीने भगवा ध्वज फडकूद्या

सातासमुद्रापारही डंका नौबतींनी

मराठी पाऊल पुढे पडूद्या



Rate this content
Log in