STORYMIRROR

Shreyash Shingre

Others

4  

Shreyash Shingre

Others

माझा भारत

माझा भारत

1 min
405

देश माझा हा वात्सल्याचा, अनेक धर्म ज्याच्या पोटी

ज्याच्या अंगी वसती भाषा अनेक, वसती कित्येक जातीजमाती


इथे चालती सोहळे शौर्याचे,युद्धमैदाने रक्ताने भिजती

बलिदानांची शूर वादळे गनिमाला पाणी पाजती


परंपरांशी अतूट नाते आमुचे, इतिहासही आमुचा गौरवशाली

पराक्रमांचे दाखले देती आमुचे सारे शूर सेनानी


आयुर्वेदाचा वसा घेऊनी, योगकला आम्ही जगा शिकवली

रूप बदलूनी मानवाचे शल्यचिकित्सा जगास दिधली


अष्टकलांचे वरदान आम्हांस, कलागुणांतही आम्हीच न्यारे

वसा घेउनी सत्य-अहिंसेचा भूमीसाठी लढलो सारे


भूमीचे या रक्षण करण्या शत्रूशी आम्ही धैर्याने लढलो

'इन्कलाब जिंदाबाद' म्हणत फासावरती हसत चढलो


कृषीप्रधान हा देश आमुचा, धवल क्रांतीतही ज्याचा डंका

सिनेसृष्टीही असे अग्रेसर,दिग्गजांची जणू सुवर्णलंका


मंगळाशीही नाते आमुचे,पाणी शोधले आम्ही चंद्रावरती

गगनाला जरी हात टेकले तरी पाय आमुचे जमिनीवरती


असाच आमुचा देश निराळा ज्याच्यासाठी प्राणही अर्पण

हृदयी त्याचेच नाव वसे, करतो सदा त्यालाच वंदन


असेच कित्येक विक्रम असती,असती कित्येक यशोगाथा

भारतदेशा तुझ्याच चरणी टेकवितो माथा


Rate this content
Log in