STORYMIRROR

Shreyash Shingre

Others

4  

Shreyash Shingre

Others

खरी दिवाळी

खरी दिवाळी

1 min
144

कष्टाने स्वतः बनवलेला कंदील

घरावर उजळला की बघताना मिळणारा 

आनंद म्हणजे 'खरी दिवाळी'


आईला फराळात मदत करताना

गुपचूप एखादा लाडू तोंडात टाकल्यावर

जिभेवर रेंगाळणारा स्वाद म्हणजे 'खरी दिवाळी'


चायनीज दिव्यांनी केलेल्या रोषणाईपेक्षा

मातीच्या पणत्यांनी उजळलेलं घर पाहिले

की डोळ्यांचं फिटणार पारणं म्हणजे 'खरी दिवाळी'


लयबद्ध रांगोळी काढताना त्यातील

प्रत्येक रंगातील छटा मनास भावून गेली

म्हणजे 'खरी दिवाळी'


आईबाबांना भेटवस्तू दिल्यावर 

त्यांच्या डोळ्यांतून ओघळणारे

आनंदाश्रू म्हणजे 'खरी दिवाळी'


अनाथ मुलांना खेळणी दिल्यावर

त्यांच्या चेहऱ्यावर खुलणारे 

विस्मयकारी हास्य म्हणजे 'खरी दिवाळी'


नवीन कपडे घालून सर्वांत

मिसळून रंगविलेली धुंद दिवाळी पहाटेची

मैफिल म्हणजे 'खरी दिवाळी'


भिरभिरणाऱ्या आकाशी उंच जाणारे

फटाके फुटले की हृदयात न मावणारा

आनंद म्हणजे 'खरी दिवाळी'


तिच्या नाजूक हातून फराळ घेताना

डोळ्यांची झालेली नजरानजर

म्हणजे 'खरी दिवाळी'


आणि हो स्वतःला वेळ देऊन 

उत्साहपूर्ण वातावरणात साजरी

केलेली दिवाळी 

म्हणजे 'खरी दिवाळी'


Rate this content
Log in