STORYMIRROR

Shreyash Shingre

Others

3  

Shreyash Shingre

Others

माझा छंद-लिखाण

माझा छंद-लिखाण

1 min
321


मी लिहितो कारण 

लिहावंसं वाटतं

रोज स्वतःला

सिद्ध करावंसं वाटतं

 

रोज काहीतरी

वेगळं लिहावंसं वाटतं

नवनवीन विषयांना

आपलंसं करावं वाटतं


विषयांना हात घालताना

जबाबदारी घ्यावी लागते

कोणाच्या भावना दुखावणार नाहीत

याची काळजी घ्यावी लागते


एकदा लिहायला घेतले की

मग मात्र लिहावंसंच वाटतं

प्रत्येक विषयातून समाजाला

काहीतरी द्यावस वाटतं


प्रत्येक विषयावर लिहिताना 

स्वतःला झोकून द्यायचं असतं

नवनवीन काहीतरी लिहून

समाजाचं ऋण फेडायचं असत


साहित्याला गुण द्या
लॉग इन