वेध पावसाचे
वेध पावसाचे

1 min

94
दाटलेल्या आभाळी
सौदामिनीचा डंका वाजे
तप्त धरणी, तरुलतांना
पावसाचे वेध लागे
इवल्या इवल्या मुंग्यांचीही
अन्नासाठी धडपड चाले
पिसारा फुलल्या मयुराची अन
चातकाची लगबग वाढे
गाळ दिसत्या विहिरीलाही
जणू पाण्याची आस लागे
शेतकऱ्याच्या डोळ्यांमधुनी
आनंदाचे अश्रू दाटे
कोसळता त्या पाऊसधारा
सुसाट वाराही गाणी गातो
सणासुदीच्या अधरावरती
हळूच श्रावण चाहूल देतो