STORYMIRROR

Shreyash Shingre

Inspirational

4  

Shreyash Shingre

Inspirational

एक दिवा

एक दिवा

1 min
1.5K

एक दिवा चैतन्याचा

तिमिरातून प्रकाशाकडे नेणारा

एक दिवा नाविण्याचा

नव्याची नवलाई जपणारा


एक दिवा सत्याचा 

असत्याशी झुंज देणारा

एक दिवा आपुलकीचा 

आपलंसं करून घेणारा


एक दिवा नात्यांचा

मर्मातले बंध बांधणारा

एक दिवा हृदयाचा

दोघांचा संवाद साधणारा


एक दिवा शेतकऱ्यांचा

सगळ्यांचे पोट भरणारा

एक दिवा सैनिकांचा

सर्वांचे रक्षण करणारा


एक दिवा कर्तृत्वाचा

उंच भरारी घेणारा

एक दिवा माणसाचा

माणुसकीचं नातं जपणारा


एक दिवा राष्ट्राचा

राष्ट्रहित जपणारा 

एक दिवा वसुंधरेचा

पर्यावरण तारणारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational