STORYMIRROR

Shreyash Shingre

Romance

3  

Shreyash Shingre

Romance

ती

ती

1 min
11.5K

प्रत्येक पुरुषाच्या मनामध्ये

असते ती एक दडलेली

हृदयाच्या खोल कप्प्यात

असते हळुवार जपलेली


आठवते का तुम्हास काही

जेव्हा ती भेटली होती

बावरलेल्या तुम्हास पाहून

गालातल्या गाली हसली होती


मग बोलला असाल तिच्याशी 

आपुलकी आणि प्रेमाने

गाठला असेल तिच्या काळजाचा ठोका

एका शब्दवेधी बाणाने


तेव्हा ती रुसली असेल,

खुदकन हसली असेल

तुमच्याच काळजाचा ठोका चुकवत

मुळूमुळू रडली असेल


ती आता तुमची मैत्रीण असेल,प्रेयसी असेल

नाहीतर, श्रीमती तर नक्कीच असेल

जर तिने तेव्हा तुमच्या

श्रीमुखात लगावली नसेल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance