STORYMIRROR

Pushpanjali A B

Romance

5.0  

Pushpanjali A B

Romance

अगं प्रिये...

अगं प्रिये...

1 min
28.7K


सतत तोच प्रश्न मी आवडती की ती?

अगं प्रिये हा प्रश्न मला छळतो किती!


दोघींचे भांडण ना बघवे मला

न आवळे हे कर्कश स्वर नि अबोला

प्रेम आहे केवढं माझ्यावर तूम्हा दोघीला

मग का नाही एकमेकिवर तेवढीच ग प्रीति

अगं प्रिये हा प्रश्न मला छळतो किती!


मला तुम्ही दोघी तेवळ्याच गं प्रिय

एक माय माउली दुसरीत अळकला हा जीव

पक्ष कुणाचा घेऊ आणि कुणाची कीव

मन दुखायला नको याची मज आहे भीति

अगं प्रिये हा प्रश्न मला छळतो किती!


दोघी असतात गोडं तर वाटतं मस्त छान

गप्पा गोष्टीत वेळेचा नसतो मग भान

न घरात क्लेश किंवा नात्यात तान

दृष्ट लागेल अशी घट्ट ही नाती

अगं प्रिये हा प्रश्न मला छळतो किती!


असे हे नाज़ुक नाते त्यात गैरसमज भरपूर

होउद्या आज हे मनातले विष सारे दूर

वाचेने लढणारे नसतात हो शूर

पडूद्या अश्या कलहावर माती

अगं प्रिये हा प्रश्न मला छळतो किती!


अस जगण्यात सांगा मज़ा तरी काय

हसत खेळत राहण्यात खरी मज़ा हाय

त्यात ही चिमुकली म्हणजे दूधावर्ची साय

तिला ह्या सुंदर नात्याची होऊ दया प्रचिती

अगं प्रिये हा प्रश्न मला छळतो किती!


आता विसरा हे रुसवे फुगवे सारे

चला आता सगळे सोबत चला रे

वाहु द्या असेच समृद्धि चे वारे

हवे मला तुमची सोबत आणि हात हाती

अगं प्रिये ह्या प्रश्न्नाला आता देऊया इति!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance