STORYMIRROR

RohiniNalage Pawar

Romance

4.2  

RohiniNalage Pawar

Romance

एकतर्फी प्रेम

एकतर्फी प्रेम

1 min
31.5K




एक एक दिवस

खुप मोठा भासतो,

रात्रही नकळत अशीच

आठवणींत जागवतो...||1||


छोट्या छोट्या गोष्टीही

मोठ्या भासत असतात,

समझूत नाही गैरसमजच

मोठ्या जागा घेत जातात...||2||


प्रेमात अपेक्षा ही

मुळात कधीच नसते,

पण तरीही नकळत मन

अपेक्षाभंग होत जाते...||3||


समोरच्याचा होकार नाही

हे मन वेड ऐकतच नाही,

स्वतःच्या चुकीत त्याला

दोष देण ही योग्य नाही...||4||


काही असो एकतर्फ़ी का होईना

प्रेम हे प्रेम असतं,

मिळो ना मिळो

आठवणी मात्र देत जातं...||5||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance