पाऊस,तो आणि मी
पाऊस,तो आणि मी


ढग दाटून आले की तुझी आठवण येते,
पावसाच्या सरीं मध्ये मग मी ही ओलेचिंब भिजते...
पहिल्या सरींत जसा मातीचा गंध दरवळतो,
तुझ्या आठवांत तशीच मी पण हरवते,
कारण पाऊस तुझं नि माझं नातं उलगडतो...
त्याला माहित नसतं कधी, कुठे नि किती बरसावे,
तोच स्वतःचाच मालक म्हणून मनसोक्त बरसून घेतो,
जसे तुझ्या कवेत तू मला सामावून घेतो...
तुला पावसात मी कधीच नाही का आठवत ???
मला तर पाऊस निमित्त आहे
कारण तुझी आठवण माझी पाठ कधीच नाही सोडत...
तुला नसेल समजलं तुझं,माझं नि पावसाचं नात,
पण मला तो आपलाच एक जिवलग वाटतो...