व्हॅलेंटाईन विशेष
व्हॅलेंटाईन विशेष


प्रेमाला वय नसतं , बंधनही नसतं
तिथे असतो तो फक्त निखळ किनारा...
जिथे कोणीही हक्क गाजवतं
भावनांना तिथे सोडून परतीच्या वाटेला निघतो...
मैत्री येते , प्रेयसी येते
कुटुंब तर तिथे पहाराच देत असते,
राग,लोभ,क्रोध,मत्सर काही असो
प्रेमाला प्रेमाने सगळंच सावरता येते...
तू ,मी,आपण,आम्ही तुम्ही
कोणाचाही तिथे वशिला नसतो,
मनाशी मनाच्या झालेल्या नात्यांचा
तिथे लढत लढत न्याय होतो...
प्रेम सगळीकडे सारखंच असतं
काही जबाबदारी खाली दबलेलं असतं
तर
काही जबाबदारी झटकून वर डोकावत असतं...
आजच्या युगात प्रेम म्हणजे बाजार झालाय,
आवडलं की तेच प्रेम असंच समजलं जातंय,
कोणीतरी सांगा यांना प्रेम हे मिरवण्याची गोष्ट नाही,
प्रेम म्हणजे त्याग
प्रेम म्हणजे बलिदान
प्रेम म्हणजे समर्पण.
जिथे प्रेम असतं तिथेच प्रेम दिसतं आणि जगतही,
तेही निरंतर...