दिवाळी
दिवाळी
सगळीकडे दिवाळी सारखी नसते
कुठे दिव्यांची झगमगाट असते तर
कुठे अंधारात एकच दिवा असतो...!!१!!
कुठे हसत खेळत दिवाळी जाते
तर कोणी डोळ्यातून वाहणारे अश्रू आवरत असते !!२!!
कुठे सुखात सुख भर टाकते
तर कोणी दुःखात दुःख अजून भर टाकते !!३!!
कुठे नाती तुटेपर्यंत भांडणे होतात
तर कोणी तुटलेली नाती जोडली जातात !!४!!
कुठे पहाटे पासूनच फटाक्यांची आतिषबाजी सुरू होते
तर कोणी रात्रंदिवस गोळ्यांच्या आवाजात लढावं लागत. !!६!!
कुठे नव्या वस्तूंचा पाऊस पडतो
तर कोणी जुन्या का होई ना पण गोष्टी मिळाल्या म्हणून आनंदात असतो..!!७!!
कुठे फराळाच फराळ असतो
तर कोणी एका घासासाठी घरोघर फिरत असतो ..!!८!!
म्हणून म्हणते
सगळीकडे दिवाळी सारखी नसते... !!५!!
