कविता- आपला स्वर्ग
कविता- आपला स्वर्ग
ही धरती
ही अवनी
आपला स्वर्ग
आहे हा निसर्ग
डोंगर, दऱ्या
झरे , नद्या
राने , जंगल
सारे मंगल
ठेवतो निसर्ग
पानं, फुल
फळं मेवा
मुक्तहस्ते देतो
हा निसर्ग
पशु, प्राणी
पक्षी,जलचर
यांचे घर
हा निसर्ग
माणूस एक
मोठा कृतघ्न
स्वार्थासाठी
नष्ट करतोय
निसर्ग
करू प्रयत्न
सारे मिळून
करू रक्षण
निसर्गाचे..