कविता-महिला दिनानिमित्त-
कविता-महिला दिनानिमित्त-
बोलण्यात, कृतीत असते
सगळी विसंगतीच तुमच्या
कौतुकाचे शब्द तिच्यासाठी
येऊ द्या ना ओठी तुमच्या
घरवाली म्हणून राबायचे तिने
वर नोकरी पण करायची तिने
तुम्हाला असते का हो कधी ?
तिच्या मनाशी काही देणे -घेणे
हवा तेव्हा, हवा सहवास तिचा
विचार करा कधी तिच्या मनाचा
जबाबदारी झटकणे सहज सोपे
नसतो संसार तिच्या एकटीचा
महिलांच्या उत्तुंग कार्याचा
करावा मनापासून सन्मान
नाही कमी कशात महिला
याचे तरी ठेवा सदा भान