आदरणीय मृणालताई गोरे-पोवाडा.
आदरणीय मृणालताई गोरे-पोवाडा.
सलाम मृणालताईना।नागरी निवारा शिल्पकाराना।थोर विचारधाराना।
झुंजार कार्य गरीबाला।विश्वासू मंडळी जोडीला। कार्याचा वसा उचलला।आदर्श ठेवला भारत देशाला।जी जी जी
अंगात जोश कामाचा।अहोरात्र ध्यास गरीबांचा।प्रगती कामगारांची करण्याचा। कामगाराना निवारा देण्याचा।
त्यांच्या कष्टाला न्याय देण्याचा।सर्व सुखी कुटुंब करण्याचा। मान राखला मुंबई नगरीचा।जी जी जी
शासनाने विश्वास ठेवला।शब्द मृणालताईंला दिला।
नागरी निवारा भूखंड मिळाला।सुरवात झाली विकास कार्याला।गोरगरीबाला निवारा दिला।नागरी निवारा त्यांनी वसविला।घरा, घराच्या माई झाल्या ।ज
ी जी जी
प.बा. सामंत, कमल देसाई जोडीला ।त्यांच्या कार्याला बळ देण्याला।विश्वासाची साथ जोडीला।गरीबांचे साऊलीचे छत्र आधाराला।आदर्श प्रकल्प मुंबई नगरीला।जी जी जी
सर्व सुख सोई त्यांनी दिल्या।आदर्श नवीन पिढीला।
संघर्ष त्यांचा कार्याला।हिम्मत त्यांची अंगाला।कीर्ती सारी त्यांची जगाला। हेवा वाटतो त्यांच्या परमार्थला।
कर्तुत्वाचे जीवन जनतेला। जी जी जी
गरीबांसाठी जीवन अर्पिले।जीवनाचे सार्थक झाले।
स्वस्तात घर मिळाले।विश्वस्त न्यायी मिळाले।अडचणीस सामोरे गेले।वास्तुनचे जतन केले।मृणालताईचे शब्द पाळले। जी जी जी