"खेळ ऊन सावल्यांचा" (कविता)
"खेळ ऊन सावल्यांचा" (कविता)


जन्मताच तोंडी
चमचा सोन्याचा
लेकरा दूध पाजण्या
आता तोच शिंपल्याचा
कपड्यास कधीच
नव्हता एकही डाग
कपड्यां विन आता
देहाची होतेय आग
फिरायला होती
चारचाकी गाडी
बनलीय आता
पायांची काडी
आहार घेतला
चोपड तुपाशी
मारतोय आता
रोजचं उपाशी
राहायला होती
सुंदर माडी
मिळांना पैसा
कराया दाढी
सगळ्यांनीच केला
माझा लाडच लाड
बायकोला म्हणतो
चटणी भाकर वाढ
झोपायला होता
मऊ मऊ बिछाना
कोणी साधं आता
गोणपाट ही देईना
खर्चास होता
अमाप खजाना
पैसा सुद्धा आता
बघायला मिळनां
श्रीमंतीचा होता
चढलेला माज
उतरला आता
श्रृंगार अन् साज
आली गरिबी म्हणून
कधीच नका लाजू
श्रीमंतीच्या काळात
कधीच नका माजू