STORYMIRROR

yuvaraj jagtap

Tragedy

3  

yuvaraj jagtap

Tragedy

मी एक नारी

मी एक नारी

1 min
345

मी एक नारी

जन्मापासूनच स्त्रीत्वामुळे

विखारी चटके 

नव्हे

सर्वांगी डागण्या

सोसत आलेली

माझ्यामुळेच आईच्या

मातृत्वावरही ही

कुटुंब निराशेचे आघात

त्यातूनही कशीबशी

आईच्या 

नरक यातनेतून

घेऊन जन्मास आले

धरेवर

तर इथे मरणासन्न

कपाळी आट्या अन

तिरस्कारी चेहरे

आता कुठे चार पाच

वर्ष पूर्ण होते न होते

तोवर

मादीरूपी या माझ्या देही

वासनांध नजरा 

जाळी विणायला

करतात सुरू

त्यात आप्त बाहेरचे नातलग

कोणीही आपल्या

वासना पुर्ती साठी

करीत राहतो अत्याचार

या कोवळ्या नाजूक

अन न उमललेल्या

कळीवर

जसजशी होते मोठी

तसतशा कलंकाच्या

मोहरा गडद होत जातात

माणसातील पशु जागे होऊन

या देहाचे वासनांधतेने

लचके तोडत राहतात

अशा कलंकित देहास

कोण आता स्वीकारणार?

मग आपसूकच 

पाय देहविक्री कडे

वळतात

पोटाची खळगी 

भरण्याकरिता

तोच एक शेवटचा

मार्ग दिसतो

नाही तर

आत्महत्या ने

शेवटचा अंक संपतो

माझ्या या अंतास

कारण झालेल्यांना ही

आई होती

त्यानेही मादीच्याच 

पोटी जन्म घेतलेला

तरी ही 

मादी रुपी देहास

कलंकित करून

अंतास कारण

ठरलेल्या

मदमस्त नरास

याची का नाही 

उरलेली जाण??

मी पुन्हा

जन्म घेईन

मादी म्हणूनच

दोन हात करील

या ढोंगी समाजाशी

शरीराने असेन मादी

पण नरासमान राहीन

बुरखा पांघरलेला

पापी दुष्ट नराधमांना

आई, बहीण यांच्याशी

कसे वागावे

याचा चांगलाच

धडा देईन

अन

पुढील जन्मी ही

नारी म्हणूनच जन्म घेईन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy