STORYMIRROR

Mina Shelke

Tragedy

4  

Mina Shelke

Tragedy

आई मला जन्म दे ना...

आई मला जन्म दे ना...

1 min
27.7K


एका कोवळ्या बीजाला

गर्भी जागा देशील ना

निरागस या कळीला

आई जन्म देशील ना !!!


आयुष्याचं दान दे ना

पाहू दे मलाही जग

माझ्यासाठी एकदाच

सोसावीस तूही धग


कुविचार, कर पतन

भेदाभेदी नको घाव

देशीलचं मला जन्म

उधळून लाव डाव


शान वाटेल देशाला

असे कतृत्व गाजेल

अभिमान वाटे तुज

असा गौरव होईल


लेक गुणवंत तूझी

तुच रहा ग तारण

गर्भातचं नको देऊ

अल्पायुषी हे मरण


काय गुन्हा असा तिचा...

ठणकाव त्या सर्वांना

अजिबात बधू नको

पापी त्यांच्या कर्माला




Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy