Mina Shelke

Others


3  

Mina Shelke

Others


सावधान !

सावधान !

1 min 260 1 min 260

सोहळे इथे मरणाचे संपले आहे 

शव कुणाचे बेवारस पडले आहे 


मोहमायेचे बंध विरून सारे गेले 

तांडव सैतानी हे भयाण चालले


मृत्यूची भयंकर अशी लाट आहे

श्वासात गतिमान तिची वाट आहे


सावधान असावे रे आता मानवा 

घरीचं थांबून रोखावे दृष्ट दानवा 


कधीही निघेल फतवा त्या यमाचा  

भरवसा न उरला घेतल्या श्वासाचा 


जपावे किती अन कसे जीवाला !

प्रश्न एक निर्माण नव्या क्षणाला


काल बेफिकीरी होती जगण्यात

चाप आज स्वैराचारी वागण्यात


माणूस माणसाला लागला घाबरू

स्पर्शाने सुध्दा मन लागले चाचरू 


मनुष्य जाती मागे सुरू पणवती

कुठल्या गुन्ह्यांची फाडली पावती !


प्राणीपक्षी तेवढा संचारतो मुक्त 

पाळून होता तो निसर्गाची शिस्त


देवच जाणे, काय घडेल यापुढे

कुणास सुटले कधी नियतीचे कोडे !


Rate this content
Log in