Mina Shelke

Inspirational


3  

Mina Shelke

Inspirational


अभंग

अभंग

1 min 11.6K 1 min 11.6K

विष पेरू नका । काळ हसतोय

वळ उठतोय । शब्दांतूनी


कलह मनीचे । द्यावे सोडूनिया 

घ्यावे जोडूनिया । बंध पुन्हा


भरवसा नसे । घडीचा रे येथे

भयभीत जिथे । जग सारे


लागले ग्रहण । मानव जातीस

धरीला वेठीस । नियतीने


सोड अहंकार । सोड तो गर्व ही

संपले पर्व ही । रावणाचे


मनातली अढी । भावनांची कोंडी

वाट ती वाकुडी । धरू नको 


माणुसकी धर्म । येऊ दे कृतीत

ठेविल स्मृतीत । इतिहास


जागू दे मूर्तित । पुन्हा देवपण 

राख तू इमान । कर्तव्यात


डाव टाकू नको । घाव घालू नको

बोल घेऊ नको । स्वतःवरी


नशिबाचा खेळ । पलटला वार 

पसरला ज्वर । जगभर


म्हणूनिया सांगे । लेखणी मिनूची 

थट्टा निसर्गाची । करू नये


Rate this content
Log in

More marathi poem from Mina Shelke

Similar marathi poem from Inspirational