STORYMIRROR

Mina Shelke

Others

4  

Mina Shelke

Others

दूरदेशी गाव माझा

दूरदेशी गाव माझा

1 min
24.4K

दूरदेशी राहिला गाव माझा...

एकलाच हिथला डाव माझा 

जीवा नाही रे हिथे ठावं आता 

भेटेल का पुन्हा गाव तो माझा


भुललो लखलख या दुनियेला...

सोडूनि आलो सारी नातीगोती

इथेच रमलो काया ,वाचा ,मनी

विसरलो मी जन्मभूमीची माती


आज मला आठवतो तोचं गाव 

जिथे नव्हता रंक , राव हा भेद 

सर्वाप्रती रूजलेला तो समभाव 

प्रत्यक्ष जागलेला ज्ञानोबाचा वेद 


छोटाच तरी आधार किती मोठा

माणूसकीला तिथे नव्हता तोटा

आपुलकी साठी अनेक पायवाटा 

माणसांनी भरलेला समृद्ध ओटा 


भाव खरा तो असायचा मायेचा

नसायचा खोट्या या देखाव्याचा 

सुखदुःखांत त्या छत्र सावल्यांचा

मेळा जमायचा अंगणी आप्तेष्टांचा


आठवता घरदार व्याकुळले मन

मायबाप अन् ते वेशीचेे हो व्दार...

घुटमळला श्वास पुन्हा हा एकवार

डोळ्यातून ओघळली अश्रूंची धार...


आज घडीला ,पडलो मी एकटा

श्वासावर करितो जागता पहारा  

कोणी नाही इथे माझे सगेसोयरे

साठवणींचांच तेवढा एक सहारा


यावा लवकरी योग तुम्हा भेटीचा 

धावा करीतो रे विघ्नहर्त्या गणेशाचा

भाव समजूनी घे दाटल्या कंठीचा

तूचि तारणहार देवा आहेस विश्वाचा 


Rate this content
Log in