Mina Shelke

Others


3  

Mina Shelke

Others


अभंग

अभंग

1 min 12K 1 min 12K

जाणा वेळ काळ । मग कुटा टाळ

तुम्ही हो वाचाळ । शांत रहा


दिस नाही बरे । व्यर्थ नको जिव्हा

चालवूस भावा । ऐक जरा


इखाची पेरणी । शब्दांची करणी 

नको ती भरणी । टकुळ्यात


पक्ष आणि झेंडे । कशास मिरवी

तिरंगा थोरवी । ठेव ध्यानी


निरर्थक गप्पा । करितो नेत्यांच्या

बघ तू स्वतःच्या । योगदाना


उचलली जीभ । लावितोस टाळ्या

बऱ्या नव्हे खेळ्या । या घडीला


ऐवढे का सोपे । देशाचे दायित्व

निभावणे सत्व । कठीण रे


कशापायी बोल । लावितो तू वेड्या

बुध्दीच्या तोकड्या । ठेव भान 


द्वेष तिरस्कार । तूझा रे पोकळ

बिषारी मोहोळ । आगडोंब


तू जप स्वतःला । होईल अनर्थ

सांडू नको व्यर्थ । बोल खोटे


धुरंधर पार्थ ।आहे एकजूट 

तुझी काथ्याकूट । वेगळीचं 


अती तिथे माती । म्हणं ठेव ध्यानी

देशापेक्षा कोणी । मोठा नाही


मिनू म्हणे देवा । क्षमा कर त्यांना

परिस्थिती ज्यांना । समजेना


Rate this content
Log in