लॉकडाऊन
लॉकडाऊन
लॉकडाऊन विषय
मुळात नाहीचं गमतीचा
अविभाज्य भाग आहे
राष्ट्रीय सुरक्षेचा
सध्यातरी योग्य वेळ नाही
राजकीय वादविवाद करण्याची
गरज आहे फक्त एकजूट
दाखवून समजून घेण्याची
द्वेष, तिढे, आकस नकोत आता
कशासाठी! पेरायचे विष जनी
आपलेच आहेत सारे हीच
भावना असावी सदा मनी
आदर ठेवावा राष्ट्रीय पदाचा
नको विचार पक्ष आणि चिन्हांचा
कशाला हट्टाहास हवा !
नको त्या भलत्या कारणांचा
आवर घाल
ावी विखारी शब्दांना
आणि चवचाळ जिभेला
देश अभिमान बाळगून उरी
सहकार्य करावे देशाला
सुजाण नागरिक म्हणून
कर्तव्य ऐवढे निभवावे आपण
भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी
नकोचं ते, नको ते शहाणपण
यातंच भलं आहे सर्वांचं
चातुर्याने संकटाशी लढायचं
शत्रूला नामशेष करण्यासाठी
प्रत्येकाने भान ठेवून वागायचं
जाईल हेही संकट निघून
धीर, संयमाची आहे कसोटी
जनतेची साथ व प्रशासन हात
नक्कीच फळास येईल सचोटी