The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Mina Shelke

Others

4  

Mina Shelke

Others

अभंग ..🌺

अभंग ..🌺

1 min
23.3K


ऐक रे मानवा । गोष्ट आहे खरी

सुरक्षित घरी । राहण्याची


काळ नाही बरा । सांगतोय वारा

ऐकूनिया नारा । सावध हो 


ऊभी आहे दारी । यमाची सवारी

नको रोडवरी । आता तरी


दिनरात गस्त । घालितो पोलीस

जीव हा ओलीस । तुजं साठी


निकराचा लढा । चालू इस्पितळी

डाँक्टरांची टोळी । कार्यरत


नर्स आणि बाँय । अविरत सेवा

मानवता ठेवा । जपतोयं


हाँस्पिटल स्टाफ । साराचं झटतो

मृत्यूशी झुंजतो । निर्धाराने


पत्करून धोका । लढती तपस्वी

होण्या ते यशस्वी । साथ द्यावी


शासन तत्पर । सांगे वारंवार

नका सोडू घर । जनार्दना


कुणी तो नाठाळ । झुगारून बंध

विहार स्वछंद । बरा नव्हे


कुणी तो वाचाळ । बरळी बरळ

ओकतो गरळ । अफवांची 


ऐसिया लोकासी । धडा शिकवावा

वाळीत टाकावा । महामूर्ख 


उपरती यासी । होईल रे कधी

संक्रमना आधी । सावर रे


उरफटा गडी । रक्षकासी नडे

फोडावे नरडे । राक्षसाचे


मिनू म्हणे जना । देवदूत सारे

देवाची लेकरे । पृथ्वीवरी


Rate this content
Log in