अभंग
अभंग
1 min
114
भाक ऐक देवा । वाट दाव देवा
करिते रे धावा । गणराया
गाव आहे दूर । स्वर तो कातर
मायबापा घोर । लेकराचा
होऊनिया दुवा । दिनदुःखी जीवा
आश्रय तू द्यावा । गजानना
घराची ती ओढ । निघाला चाकर
पोटाला भाकर । नाही बघ
मन सैरभैर । सुचेना रे काही
ऊनवारा साही । निर्वासित
वेगे वेगे धावे । पाऊली निर्धार
अश्रूंची ती धार । थोपवून
कंठाला जडत्व ।आठवे ममत्व
नको पाहू सत्व । श्री गणेशा
घडवूनि भेटी । पडू दे रे मिठी
असेल रे ओठी । नाम तुझे
दिन दुःखितांचे । करावे रक्षण
करीते औक्षण । शब्दवेडी
