ऐक रे---मना
ऐक रे---मना


ऐक रे "मना" तुला सध्या खूप शांत राहायचे आहे
घरीच थांबून स्वतःला व्यस्त व मस्त ठेवायचे आहे
लगाम लावून शिस्त बघ आता पाळायची आहे
दृढ संकल्प करुनि स्वस्थ आरोग्य करायचे आहे
गर्दीत जायचे नाही, संक्रमणास टाळायचे आहे्
प्रशासन निर्बंध सारे कसोशीने तू पाळायचे आहे
जन प्रभावित होईल असे आचरण ठेवायचे आहे
ठेव ध्यानी इतरांना सुद्धा तुलाच रे जपायचे आहे
संयमित राहून चोचले देहाचे तुला गाळायचे आहे
स्वच्छतेचे नीतिधर्म पाळून सतर्क असायचे आहे
>
कुटुंब व समाज दोन्हींची काळजी घ्यायची आहे
आदर्श नागरिक होऊन कायमचे मिरवायचे आहे
रोल माॅडेल तुझा तुलाच देशाचा घडवायचा आहे
कोरोना विषाणू आचारविचाराने हरवायचा आहे
सावध, सजग राहण्याची गरज आज तुझी आहे
गरूडझेप पुन्हा घेण्यासाठी थोडे तू थांबायचे आहे
आता खंबीर होऊन सतर्क राहून जिंकायचे आहे
भारतीय काय असतो, हे जगाला दाखवायचे आहे
लवकरच मुक्त होशील, काळ थोडा जाणार आहे
"मी माझा रक्षक" ब्रीद हे पूर्णत्वास न्यायचे आहे