*छडीची आठवण*
*छडीची आठवण*
कशाला मारली छडी
गुरुजी केला तुम्ही गुन्हा!
चला लवकर आता
माझं चुकलं म्हणा!
माहित नाही तुम्हाला
आलायं नविन कायदा
केला नाही का मुख्याध्यापकांशी
न मारण्याचा वायदा
शिस्त लावण्याच्या भानगडीत
आता नका तुम्ही पडू
हात लावायच्या अगोदरचं
मुले लागतात रडू
छडी लागे छम छम
म्हण झाली जुनी
असेल जरी चूक
बाप म्हणतो पोरगं माझं गुणी
गृहपाठाची आमच्या
कशाला करता चिंता
सारखा काय अभ्यास
केला का म्हणता?
क्रमांक मात्र आमचा
पहिला या
यला हवा
असा शिकवण्यातं
उपक्रम राबवा नवा
पूर्वी असायची तुमची
आदरयुक्त भिती
हाती छडी तुमच्या
दरारा किती?
आता मात्र हवी
तुमची मधाळ वाणी
चूकून मारलं तरी
भिती बाळगा
पाहिलं का कुणी!
जुना काळ गेला गुरुजी
नाही आता वाटत भिती
आमच्या बाजूने आता
अमाप कायदे किती!
हसत खेळत शिक्षणाचा
घ्या आता तुम्ही वसा
नाहीतर सरकार म्हणेन
तुम्ही आता घरी बसा!
येऊ देवू नका
आता कधी छडीची आठवण
मनात करा आता
गोड शब्दांची साठवण