Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Ashvini Dhat

Others

4  

Ashvini Dhat

Others

दिवाळीतील पाडवा

दिवाळीतील पाडवा

1 min
12.4K




साडेतीन मुहूर्तांपैकी

एक म्हणजे पाडवा

एकात्मतेने वाढवू

नात्यातील गोडवा


रांगोळीने रेखाटू

बळीराजाचे चित्र

सर्वत्र दिसेल ते

सुंदर अनोखे मात्र


व्यापाऱ्यांसाठी ही

नववर्षाची सुरुवात

वहीपूजनाने पाऊल ठेवतात

ते व्यापाराच्या नवीन पर्वात


सायंकाळी करेल

पत्नी पतीला औक्षण

प्रत्येक कुटूंबासाठी

असतो तो सोनेरी क्षण


अशी ही दिवाळी

म्हणजे अनेकात एक

जी देऊन जाते आपल्याला

सुखद आनंदाचा चेक


Rate this content
Log in