STORYMIRROR

Ashvini Dhat

Drama

3  

Ashvini Dhat

Drama

आली दिवाळी

आली दिवाळी

1 min
13.3K




दिवाळीचा सण

आला आता घरा

चला आता

आनंदोत्सव साजरा करा


वसुबारस म्हणजे

गाय-वासरांची पुजा

अंगी येईल उदारता

पाप होईल वजा


धनत्रयोदशीला

धन्वंतरी प्रसन्न

मिळेल आरोग्यदायी जीवन

प्रसन्न होईल मन


नरकचतुर्दशीला

वाईट विचारांवर धैर्याने करु मात

तेवत ठेवू सदा

माणूसकीची वात


लक्ष्मीपूजन म्हणजे

लक्ष्मीचा सहवास

होईल लक्ष्मीची कृपा

वाढेल धन-धान्यांची रास


बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा

पुरणपोळीचा अनोखा गोडवा

आता माणुसकीच्या नात्याने

मनी स्नेहभाव वाढवा


भाऊबीजीच्या दिवशी

बहिण येते घरा

आयुष्यभर तिचे

प्रेमाने स्वागत करा


अशी दिवाळी म्हणजे

आनंदाचा मेवा

साजरी करा एकत्र

भेद-भाव विसरुन जावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama