Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pavan Pawar

Children Stories Drama Action

4  

Pavan Pawar

Children Stories Drama Action

बालपण

बालपण

1 min
272


गेलेले दिवस आठवणीत जगतो,

एकांतात त्याच आठवणीने मनात हसतो

लहानपणीच्या गोष्टी आता मुर्खपणा वाटतात,

त्याच जगलेल्या घटनेवर आमचे पालक आजही हसतात


शाळेत फक्त खिचडी खायला जायचं,

परीक्षेच्या वेळी घरीच बिमार पडायचं

मास्तर विचारणार म्हणून सर्वात मागे बसायचं,

हजेरी झाल्यावर समोर बसण्यासाठी भांडायच


इंग्रजीच्या तासाला वारंवार पाणी पिण्यासाठी पळायच,

गणिताच्या तासाला लघवीचे कारण सांगायचं

ईतिहासाचे साल कधी लक्षात नाही रहायचे,

परीक्षेतील चुका शिक्षक देखील नजरेआड करायचे


मामाच्या पत्रावर कबड्डीचा मारा चढायचा,

खो - खोच्या खेळामध्ये बुद्धीबळाचा वारा चालयचा

बुद्धीमत्तेच्या चाचणीत खोट्या उत्तरांचा आवाज वर जाई,

शिक्षकांच्या नजरेत आपूलकीची भावना दिसून येई


रविवारचा दिवस जास्त प्रेरणा दयायचा

शक्तीमान बघायला पूर्ण वर्ग जमा व्हायचा

रात्रीच्या कुटण्याची मजा आताचे पॉपकॉर्न नाही देवार,

आम्ही जगले जे बालपण आताची पीढी कधी जगणार


Rate this content
Log in