रूप
रूप
घुंगराच्या आवाज मांजरीचे ऐकला,
धाड धिप्पाड माणूस घामाघुम झाला
श्वेत वस्त्राची नारी रस्त्याने दिसली,
वीज कडाडली तिचा चेहरा झाकला
पाय दिसे जीचे उलट्या दिशेचे,
नजर झाकली वासणी नजरेचे
रूप मनमोहक श्वेत केस उडते
नारं खट्याळ जोरात हसते
रूप सुंदर चेहरा कुरूप दिसला,
काळया दाताचा तिचा विद्रूप चेहरा भासला
शरीराने मादक चाल नागीणीच्या वळण्याची,
मान फिरविते चारही दिशांनी झुकावयाची
रात्र काळोखी वीज पांढरी चमकायची,
रूप पाहुनी त्या नारीचे डोळे चक्क व्हावंयची
हात पाय आपटून तिचे माझे मन अधीर झाले,
तिच्या आवाजाची ध्वनी माझ्या भीतीची कारण झाले

