STORYMIRROR

Saishankar Parab

Drama Romance

3  

Saishankar Parab

Drama Romance

सख्या तूच रे माझा पारिजात

सख्या तूच रे माझा पारिजात

1 min
244

गंध तुझा अलौकिक असा 

दरवळे क्षणभंगुर ह्या जीवनात माझ्या, 

शुभ्र पाकळ्यांन सोबत शोभुन दिसे 

नाजुक शेंदरी ही नाभीत तुझ्या....


छंद समर्पणाची

किमया तुझी आगळीवेगळी 

राजसा तुच रे मनावर बिंबवली, 

फांदीवरुनी तु गळुन पडता सख्या 

मायेने झेलणारी भुई जणू ही गंधाळली...


तुझ्याच परिमळाने गंधाळलेले हे वारे 

स्पर्शुनी जाता का? अंगावर येई शहारे, 

चांगलेच ठाऊक आहे मला तुझे ते बहाणे नवनवे 

मला नादी लावण्याचे हेच तर असतात तुझे प्रेमळ इशारे...


माझ्या प्राणात भिनलेले श्वास तुझे हे सारे

करती वेड्या मनाच्या व्याकुळतेवर मात, 

अलक्ष चांदण्यापरी असाच उमलुनी 

ये रे सख्या तुच रे माझा "पारिजात"....


सख्या तूच रे माझा "पारिजात"....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama