STORYMIRROR

Pandit Warade

Drama Romance

4  

Pandit Warade

Drama Romance

हातात हात माझ्या

हातात हात माझ्या

1 min
278

सौख्याचे जीवनात, गाशील तू तराने

हातात हात माझ्या, दे साजणी सुखाने ।।धृ।।


तुझ्या कडून येता, वारा गंधाळलेला

बेधुंद या मनाला, येतो नवा तजेला

होऊन गंध धुंद, गातोय प्रीत गाणे

हातात हात माझ्या, दे साजणी सुखाने ।।१।।


सौंदर्य कोमलांगी, सुस्नात यौवनाचे 

यावे जुळून वाटे, हे बंध रेशमाचे

रोमांच शरीराचे, मी थोपवू कशाने

हातात हात माझ्या, दे साजणी सुखाने ।।२।।


तुझ्या विना नसावा, काहीच अर्थ येथे

सोडून तुला आहे, आयुष्य व्यर्थ येथे

हाती तुझ्याच आहे, विश्वात येणे जाणे 

हातात हात माझ्या, दे साजणी सुखाने ।।३।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama