चंचले
चंचले


अनंत रूपे तुझी चंचले, याच जगताने पाहिली ।
मागे वळून बघ रूप तुझे आज अशी का जाहली ।।
सत्यवान पत्नी सावित्री यमालाच जाऊन भिडली ।
हरवून वादात यमाला, प्राण परत घेऊन आली ।।
नारीच्या शिक्षणासाठी दाह जन क्षोभाचा साहिला ।
ज्योतिबांच्या सावित्रीने शैक्षणिक लढा लढला ।।
लढतांना दहशत वाद्यांशी वीर पती शहीद झाला ।
महाडिकांची लक्ष्मी स्वाती सैनिक झाली लढण्याला ।।
आज अचानक काय झाले? नारी अशी का बिघडली?
स्वातंत्र्याच्या नावा खाली स्वैराचारी का हो बनली?
कोण होती? काय झाली? स्वतःस का ती विसरली?
नारी जातीच्या पावित्र्याची का हो पातळी घसरली?
नवऱ्या सोबत पटत नाही म्हणून का वैरीण झाली?
सौभाग्याचा काटा काढण्या गुंडांनाच सुपारी दिली ।।