.प्रमोद घाटोळ

Tragedy

5.0  

.प्रमोद घाटोळ

Tragedy

शोधु माणूस कुठीसा ?

शोधु माणूस कुठीसा ?

1 min
348


⭕⭕⭕🔹🔹⭕⭕⭕


शोधू माणूस कुठीसा ?


फिरलो दाही दिशांनी

भेटले आकाश फाटलेले

सिमा ओलांडू कसा मी?

इथे गावही वाटलेले ~१


पाहिला अजाण पणाने

निळा समुद्र तोही

माशांशी गट्टी केली

ठरविली जात माझी भोई~२


सांडलेले रक्त माझे

त्याचाही गंध आला

माझा शेजारचा रस्ता

तोही आता बंद झाला ~३


दिसले भिंतीवर दुभंगलेल्या

माणूसपण माठलेले

अश्रूही भिन्न दिसले

डोळ्यात साठलेले ~४


रंग मुखोट्यांना इथे

वेगवेगळे फासलेले

शोधू माणूस कुठीसा?

आहे सगळेच बाटलेले ~५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy