STORYMIRROR

Ketaki Vaidya - Music

Tragedy Others

4  

Ketaki Vaidya - Music

Tragedy Others

हे धावणे कशासाठी?

हे धावणे कशासाठी?

1 min
849

दिवसा मागुन दिवस चालले

रात्री मागून रात्री...

कळतच नाही कधीकधी

हे धावणे कशासाठी?


तीच भिंत तेच घड्याळ

तीच वेळ तोच अलार्म

वाजत असतो रोज रोज

माझ्याच कानापाशी

कळतच नाही कधी कधी

हे धावणे कशा साठी?


उठून बसता अंथरुणावरी

कराग्रे वसते म्हणता मनी

पिऊन कोमट लिंबूपाणी

उभी ठाकते काट्यावर मी

वैतागून मग म्हणते मनी

शी..... परत तेवढेच.....

मग धावणे कशासाठी?...


तेच घर,तोच ओटा

भांडी घासा, फरशी पुसा

त्याच भाज्या, तीच फळे

तोच उपमा, तेच पोहे

"आज काय विशेष"चेही कोडे

असते माझ्याच पाठी...

मग धावणे कशासाठी?


सप्ताहाचे सात वार

असती त्याला प्रहर चार

सुट्टीचा पण एकच रविवार

कामांचा तर डोंगर फार

सकाळ,दुपार,संध्याकाळ

मरमर मरता कामेकरता

जीव होई पुरता बेजार

हे धावणे कशासाठी?


तेच टेबल, तिच खुर्ची

तोच चहा, तिच कपबशी

तोच बॉस,त्याच कटकटी,

आला दिवस सरला कधी,

कळतच नाही मला कधी,

थकला भागला जीव बघता

मी म्हणते माझ्याचपाशी

एवढा आटापिटा कशासाठी?

खरंच,कळतच नाही कधीकधी

हे धावणे कशासाठी?.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy