अंतरंग
अंतरंग
गोठून जाईल शाई, इतके लिहुच नये काही,
जुळवू नये शब्दांना, उगाच सुचत नसता काही
पैशासाठी करू नये, व्यवहार कोणाचसाठी,
नजाणो आपलेच सूर, रुसतील आपल्यासाठी
वाट द्यावी करून कधी, आपल्याही भावनांना,
जाणून वादळे सारी, मुक्त करावे जाणीवांना
शुध्द भाव आहे जोवर, शब्द-सुर घालतील साद,
बाजार मांडला असता, सोडून देतील साथ
उचंबळून येईल खोल,अंतरीचे काही
तेव्हाच जन्मास येईल, कविता तुझ्या ठाई
