कातरवेळ...
कातरवेळ...
अशाच एका निवांत क्षणी
नकळत काही असे घडावे
कातरवेळी एकांतात तू
अवचित माझ्या समीप यावे..
हवे नकोचे खेळ लटके
तुझ्याचसाठी मी खेळावे
नकारातीलही होकारांचे
मर्म तुलाच समजावे ...
संकोचाचे रेशीम धागे
हलके हलके विरून जावे
स्थळ-काळाचे भान सरोनी
प्रीतीचे नव सूर जुळावे...
शब्दा वाचून तुला कळावे
शब्दांच्याही पलिकडले
मुक्तपणे मी उधळून द्यावे
सर्वस्व सारे जपलेले...

