STORYMIRROR

Ketaki Vaidya - Music

Tragedy Others

3  

Ketaki Vaidya - Music

Tragedy Others

आपलं मन

आपलं मन

1 min
176

विक्रमादित्याच्या पाठीवर बसून,

सतत कानाशी काही-बाही बडबडत राहणारा वेताळ,

तसच अगदी कान किटे पर्यंत सतत काही न काही बडबडणारं...


आपलं मन...

सणासुदीला साग्रसंगीत गोडधोडाचे जेवून,

हास्यविनोदात सुखावले असता अचानक,

जीवलगाच्या आठवणीने हळवं करणार..


आपलं मन ..

दिवसभर कष्ट करून,थकलं भागलं शरीर

पेंगुळलेल्या डोळ्यांनी जरा आडवं व्हावं,

पण भविष्याच्या चिंतेनी

सतत कूस बदलायला लावणार...


आपलं मन...

शांत प्रसन्न गाभाऱ्यात,

धूप दिपारतीच्या दरवळणाऱ्या सुगंधात,

अनादी अनंत ओंकारात सर्वस्व विसरणार,

अचानक प्रसन्नता भंग करत,


चला,चला, व्हा पुढे....अशा कर्तव्यदक्ष स्वयंसेवकाच्या आवाजाला

अहो थांबा हो.... अस वैतागुन म्हणणार

आपलं मन..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy