भाकरीचा तुकडा
भाकरीचा तुकडा
पोटाच्या खळगी
भराया मी फिरत रानोमाळी
गवताचा भारा डोक्यावरी
बाळ माझे कडेवरी
हिंडते रानोमाळी
हया पोटच्या खळग्यापायी
किती करावं मरमर
आयुष्याची मरमर भाकरी पायी
कधी संपेल मरमर
हिंडते मी पोटापायी
कधी उपासमार
कधी अर्धापोटी
कधी मिळेल पोरभर
भाकर आयुष्यभर